वर्षाला मिळाले जिद्दीचे यश

वर्षाला मिळाले जिद्दीचे यश
Published on

८५०२१
शेतीत घाम गाळत विज्ञान शाखेत ८३ टक्के
गडहिंग्लज ः ओंकार बसर्गे गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळचा. वडिलांची शेती. शेतीकामात तो वडिलांच्या सोबत जायचा. मोठा भाऊ बी. टेकचे शिक्षण घेतोय. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यानेही जोरदार परिक्षेची तयारी केली. तो गडहिंग्लजमधील शिवराज कॉलेजमध्ये बारावीचे शिक्षण घेत होता. रोज चौदा किलोमीटरचा प्रवास, शेतीत मदत आणि कॉलेज असा त्याचा दिनक्रम होता. दिवसभर कॉलेज आणि सायंकाळी पाच ते रात्री आठ ग्रंथालयात अभ्यास करायचा. घरात देखील अभ्यास करत त्याने विज्ञान शाखेत ८३ टक्के गुण मिळवत यश मिळवले.
----------------
85014
‘वर्षा’ची जिद्द अन् ८६ टक्क्यांची कमाई
नूल ः इदरगुच्ची (ता. गडहिंग्लज) येथील वर्षा शंकर काळे हिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरिबीची. कधी पायपीट, तर कधी सायकलवरुन तीन किलोमीटरवरील शाळा गाठायची. परिस्थितीची जाणीव आणि शिकण्याची जिद्द तिला बारावीच्या परीक्षेत लख्ख यश मिळवून दिले. तिने ८६ टक्के गुण मिळवले. वडिलोपार्जित शेती जेमतेम एकर. जोडीला कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी दूग्ध व्यवसाय. शेती आणि दूग्ध व्यवसाय हेच तिच्या कुटुंबाचे चरितार्थाचे साधन. दहावीचे शिक्षण झाल्यानंतर वर्षाने हलकर्णी भाग कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. कॉमर्समध्येच करिअर करण्याचा तिचा निर्धार आहे. या यशात आई-वडील, शिक्षक, भाऊ यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे तिने सांगितले. आई-वडीलांना शेती व घरकामात मदत करत अभ्यासाच्या वेळेचे योग्य नियोजन केल्याने यश मिळाल्याचे तिने स्पष्ट केले.
-----------
85025
सविता करवत
सविताचे वेळेचा समन्वय साधत यश
चंदगड ः महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील गोधनगरवाडा (ता. चंदगड) येथील सविता भागोजी करवत हिने प्रतिकूल परिस्थितीतून बारावी विज्ञान परीक्षेत यश मिळवले. तिने सत्तर टक्के गुण मिळवले. दीड वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले. आई शेती व घरकाम करते. भाऊ मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याने नोकरीपेक्षा शेती व्यवसायच स्विकारला आहे. तिच्या घरापासून मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील म. भ. तुपारे ज्युनिअर कॉलेजचे अंतर ३६ किलोमीटर. सकाळची बस पकडण्यासाठी तिला पहाटे साडे पाचलाच उठावे लागायचे. दुपारी कॉलेज सुटल्यानंतर गावाकडे येण्यासाठी दोन शिवाय बस नसल्याने या वेळेचा तिने सदुपयोग केला. या वेळेत ती कॉलेजच्या ग्रंथालयात अभ्यास करायची. घरी गेल्यानंतर सायंकाळी सहाला पुन्हा अभ्यास सुरु व्हायचा. परिस्थिती अभावी पुढे शिक्षण घ्यायचे की नाही, या चिंतेत ती आहे. वैद्यकिय क्षेत्रात तिला करिअर करण्याची इच्छा आहे.
----------
84987

मुगळीच्या आरबोळेंचे ''आशा''दायक यश
गडहिंग्लज ः मुगळी (ता. गडहिंग्लज) येथील आशा स्वयंसेविका सुरेखा अशोक आरबोळे यांनी ४९ व्या वर्षी बारावी परीक्षा देवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याची किमया केली आहे. गावचे आरोग्य, घरची शेती व जनावरांची देखभाल सांभाळत या परीक्षेत त्यांनी तब्बल ७० टक्के गुण मिळवून ''आशा''दायक यश प्राप्त केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. लग्नापूर्वी त्यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. आशा म्हणून सेवा बजावताना भविष्यात चांगली संधी मिळेल या हेतुने त्यांनी बारावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजमध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. उत्कृष्ट टाईम मॅनेजमेंटद्वारे शेती, आरोग्य, जनावरांचा सांभाळ, गृहीणी या चार जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी सर्व विषयांचा चांगला अभ्यास केला. आता भविष्यात कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेण्याचे त्यांचे ध्येय असून या यशात पती अशोक आरबोळे यांचे प्रोत्साहन मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
---------
08734
प्रियंका सदलगे

हलाखीच्या परिस्थितीत आकाशाला गवसणी
इचलकरंजी : परिस्थिती अत्यंत हलाखीची, शिकण्याची प्रचंड जिद्द अशा परिस्थितीत आईचे छत्र हरपले. मात्र न डगमगता आईच्या मायेची ऊब तशीच तिने तेवत ठेवली आणि कुटुंबाला हातभार लावत बारावी परीक्षेत ८७.३३ टक्के गुण मिळवले. प्रियंका सुभाष सदलगे (रा. शिवनाकवाडी ता. शिरोळ) असे तिचे नाव आहे. येथील तात्यासाहेब मुसळे ज्युनिअर कॉलेजमध्ये तिने विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण घेतले. आर्थिक परिस्थिती साथ देत नसली तरी तिने अभ्यासातून उद्याच्या भविष्याचा ध्यास कधीच सोडला नाही. चौदा वर्षांपूर्वीच लहानपणीच आईचे निधन झाले. अशा संघर्षमय टोकावर मोठी मुलगी या नात्याने कुटुंबाचा कणा बनली. कुटुंबाला हातभार लावत वडिलांच्या आधाराने केवळ कॉलेजमधील शिक्षणावर प्रामाणिकपणे अभ्यास केला. पुरेशी झोप, कॉलेज अभ्यास, घरची काम हे तिच्या जगण्याचे सूत्र होते. यामुळेच हलाखीच्या परिस्थितीत तिने आकाशाला गवसणी घातली.
---------
gad214.jpg :
84985
विघ्नेश माळवकर

दिव्यांगावर मात करीत ७१.८३ टक्के गुण
उत्तूर : दिव्यांग असतानाही उत्तूर (ता. आजरा) येथील विघ्नेश रामचंद्र माळवकर याने बारावीच्या परिक्षेत ७१.८३ टक्के गुण मिळवलेत. त्याचे यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. जन्मताच कायमचे दिव्यांगत्व त्याच्या वाट्याला आले आहे. मात्र त्यावर मात करीत घवघवीत यश संपादन केले. वडिलांचे वर्षभरापुर्वी निधन झाले. आई रेश्मा अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करते. भाड्याच्या घरात राहतात. आई रेश्मा खरी त्याची मार्गदर्शक आहे. त्याच्या अभ्यासात काही कमी पडू नये यासाठी तिने जिवाचं रान केले. अभ्यासाव्यतिरिक्त व्यायामाची प्रचंड आवड आहे. शरीरसौष्ठव स्पर्धेत त्याने काही बक्षीस मिळवली आहेत.
-----------
01543
आई-वडिलांच्या कष्टाचे सोने
शिरोळ ः घालवाड (ता. शिरोळ) येथील शेतमजुराच्या मुलीने बारावी विज्ञानमध्ये ७५ टक्के गुण मिळवून आई-वडिलांच्या कष्टाचे सोने केले आहे.
संचिता शिंदे ही शिरोळ येथील श्री पद्माराजे विद्यालय अँड जुनिअर कॉलेजमध्ये शिकत होती. आई-वडील शेतमजूर आहेत. दररोज दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरी करतात. घालवाड ते शिरोळ दररोज एसटीने प्रवास करून, शिक्षण घेत होती. कोणताही खासगी क्लास न लावता, तिने घरी अभ्यास करून यश मिळवले आहे. सीईटीच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतील अशी तिचे अपेक्षा असून, चांगले गुण मिळाल्यास वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याचा मानस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com