

राजर्षी शाहू स्मारक भवनाचे
लोकसहभागातून नूतनीकरण ः येडगे
कोल्हापूर, ता. ७ ः जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचे स्थान असणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनाचे नुकनीकरण केले जाणार आहे. यासाठी शासकीय निधी कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल, याचे पर्याय पाहिले जात आहेत. लोकसहभागातूनही नूतनीकरणासाठी निधी उभारला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ‘शाहू स्मारक ही वास्तू कोल्हापुरकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. येथे विकासासाठी जागाही उपलब्ध आहे. त्यामुळे टप्याटप्याने शाहू स्मारकचा विकास करण्यात येणार आहे. या कामासाठी लागणारा निधी कशा प्रकारे उभा करता येईल, याचा विचार सुरू आहे. शाहू स्मारक भवन हा कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे निधी उपलब्ध करण्यासाठी लोकसहभागाची विचार होणार आहे. आगामी काळात याचा आराखडा बनवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
चौकट
श्री अंबाबाई, जोतिबा आराखड्यालाही गती
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे विविध विकासकामांबाबतचे निर्णय घेण्यास मर्यादा होत्या. मात्र, आता मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे. त्यामुळे श्री अंबाबाई आणि जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचेही सादरीकरण केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादनालाही सुरुवात होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.