टुडे ३

टुडे ३
Published on

अनुदानित वाचनालयांकडूनच
वृत्तपत्र विक्रेत्यांची बिले थकली
चंदगडमधील प्रकार; ग्रंथालय संचलनालयाकडे तक्रार करण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १ ः तालुक्यातील ग्रामीण भागातील काही अनुदानित वाचनालयांकडूनच वृत्तपत्र विक्रेत्यांची बिले थकली आहेत. शासनाकडून या वाचनालयांना दरवर्षी अनुदान मिळते. वाचनालयाचे कारभारी वृत्तपत्र विक्रेत्यांकडून दर महिन्याला बिलाच्या पावत्याही घेतात मात्र बिले देत नसल्याचे येथील विक्रेते बाळू रजपूत यांनी सांगितले. या प्रकरणी ग्रंथालय संचनालयाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील वाचनालयांना अ, ब, क व ड संरचनेनुसार दरवर्षी अनुदान दिले जाते. त्यातून वृत्तपत्रे, पाक्षिके, मासिके तसेच पुस्तके खरेदी आणि कर्मचारी पगार दिला जातो. शासनाच्या या अर्थसहाय्यामुळे ग्रामीण भागात वाचन संस्कृती टिकून आहे. वाचनालयातील वृत्तपत्रे, पुस्तके अनेकांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. छोट्या खेड्यातून वृत्तपत्र एजन्सी नसल्यामुळे ते तालुक्याच्या गावातून दैनंदिन वृत्तपत्रे खरेदी करतात. एकाच वेळी चार ते पाच दैनिके घेणारा ग्राहक उपलब्ध होत असल्याने वृत्तपत्र विक्रेतेही त्यांना क्रेडिटवर पुरवठा करतात. पहाटे दूध संकलन करणाऱ्या वाहनातून, एसटीतून ही दैनिके त्यांच्या गावात वाचनालयापर्यंत पोहोचवण्यासाठी कष्ट घेतात. मार्च, एप्रिल महिन्यात अनुदान आले की वर्षाचे बिल एकदम देतो असे वाचनालयाच्या कारभाऱ्यांकडून सांगितले जाते. अनेकजण त्या पद्धतीने देतातही. मात्र अलीकडच्या काळात काहीजण जाणीवपूर्वक बिल देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे रजपूत यांनी सांगितले. एकेका वाचनालयाचे बिल पंधरा, वीस हजारांपर्यंत थकले असल्यामुळे एकूण व्यापारावर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. संबंधितांकडे वारंवार मागणी करूनही ही बिले मिळत नसल्याने ग्रंथालय संचनालयाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com