कुंभोज येथे ईस्‍टर संडे प्रार्थना साजरा,चाळीस दिवसांच्‍या उपवासाची सांगता

कुंभोज येथे ईस्‍टर संडे प्रार्थना साजरा,चाळीस दिवसांच्‍या उपवासाची सांगता
Published on

कुंभोजला ईस्‍टर संडेनिमित्त प्रभात फेरी

कुंभोज ः प्रभू येशू ख्रिस्ताच्‍या पुनरुत्‍थानाचा सण ''ईस्टर संडे'' उत्‍साहात साजरा झाला. ४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थनेच्‍या काळानंतर खिस्‍ती बांधवांनी पहाटे प्रार्थना सभा केली. रविवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्याने या दिवशी श्रद्धाळूंनी सहभाग नोंदविला. प्रार्थना सभेत ख्रिस्ती महिला, लहान मुले व तरुण उपस्थित होते. पहाटेची प्रार्थना घेऊन गावातून प्रभात फेरी काढली. यावेळी ''प्रभू उठला आहे''च्या जयघोषाने परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना झाली. विजय सुवासे यांनी प्रार्थना संदेश व मार्गदर्शन केले. विश्वास मोहिते, अशोक मोहिते, नेताजी महापुरे, सागर सुवासे आदी उपस्‍थित होते.
KUM26B07425

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com