प्रा.डॉ.एन.डी.पाटील महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण

प्रा.डॉ.एन.डी.पाटील महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण
Published on

शिक्षणातून चारित्र्य घडवा ः प्रा. पाटील
मलकापूर ः ‘‘विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षणाचा उपयोग करावा. शिक्षणाच्या माध्यमातून चारित्र्याची व व्यक्तिमत्वाची जडणघडण करावी,’’ असे मत साहित्यिक प्रा. डॉ. संभाजी पाटील यांनी व्यक्त केले. येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘पारंपरिक क्षेत्राबरोबर नवीन क्षेत्रांमध्ये करिअर शोधावे. ध्येय निश्चित करून ध्येयप्रतीसाठी कार्यरत राहावे. देशविकासात योगदान द्यावे.’’ प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांनी स्वागत करून शैक्षणिक, संस्कृतिक, क्रीडा व संशोधनकार्य अहवाल सादर केला. याप्रसंगी क्रीडा, सांस्कृतिक व इतर स्पर्धांतील यशस्वीतांचा पारितोषिक देऊन सन्मान झाला. उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही गौरव झाला. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुहास पाटील, भारत पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. बी. पोरे, डॉ. एस. पी. बनसोडे यांच्यासह सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. सी. एस. गिरी यांनी आभार मानले. प्रा. आर. टी. सूर्यवंशी व प्रा. आर. बी. खबाले यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com