कुशिरेचा सिध्देश घोरपडे ठरला महाराष्टाचा बेस्ट सायकलिस्ट

कुशिरेचा सिध्देश घोरपडे ठरला महाराष्टाचा बेस्ट सायकलिस्ट
Updated on

3414
सिद्धेश घोरपडे
..........
कुशिरेचा सिद्धेश घोरपडे ठरला
महाराष्ट्राचा ‘बेस्ट सायकलिस्ट’

सकाळ वृत्तसेवा
जोतिबा डोंगर, ता २२ ः सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने पुणे येथे आयोजित तिसऱ्या महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत कुशिरे तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील व पुणे क्रीडा प्रबोधिनीचा सिद्धेश घोरपडे याने तीन सुवर्णपदक मिळवून महाराष्ट्राचा बेस्ट सायकलिस्टचा किताब पटकावला त्याची चेन्नई येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
सिद्धेश सध्या दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सराव करीत असून, भविष्यामध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व करेल, अशी प्रशिक्षकांना आशा आहे. त्याने आजपर्यंत सायकलिंगमध्ये अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. तो विविध पदकांचाही मानकरी ठरला आहे. त्याला महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे प्रताप जाधव, दीपाली पाटील (पुणे), दीपाली शिळदणकर (पुणे), दर्शन बारगुजे (पुणे), विजय जाधव (कोल्हापूर), कपिल कोळी (शिंगणापूर), प्रकाश ठाणेकर (कुशिरे) यांचे तसेच आईवडिलांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com