पोहाळेत विहिरीत पडलेल्या कोल्हास मिळाले जीवदान

पोहाळेत विहिरीत पडलेल्या कोल्हास मिळाले जीवदान
Published on

03838

पोहाळेत विहिरीत पडलेल्या
कोल्ह्यास मिळाले जीवदान

सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर, ता. २३ ः पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) येथील लोहाचे खडक नावाच्या शेतात पाण्याच्या शोधात आलेला कोल्हा सरदार शिंदे यांच्या विहिरीत पडून पाच दिवस अडकला होता. त्यास वन विभागाच्या बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले.
शिंदे यांच्या विहिरीत आज ओरडण्याचा आवाज येत होता. आवाज ऐकून सरदार शिंदे गेले असता कोल्हा विहिरीत पडलेला त्यांना दिसला. त्यांनी ही माहिती निसर्गमित्र सुरेश बेनाडे व संग्राम गायकवाड यांना दिली. बेनाडे यांनी पन्हाळा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ बचाव पथक पोहाळेत पाठविले. पथकातील कर्मचारी अभिजीत पाटील व रोहित जाधव भर पावसातच विहिरीत उतरले. दोरखंडाच्या साहाय्याने त्यास हळूहळू विहिरीबाहेर काढून जीवदान दिले. कोल्हा गेले चार पाच दिवस झाले उपाशी होता. तो अशक्त झालेला दिसत होता. पथकाने त्यास पोहाळे परिसरातील डोंगरपठारातील अधिवासात सोडले. बचाव पथकास पोहाळेतील निसर्गमित्र अमित बेनाडे, बबलू कांबळे, सर्जेराव शिंदे, रंगराव खैरे, उत्कर्ष पाटील (कोलोली) यांनी सहकार्य केले .

कोट
यापूर्वी पोहाळे तर्फ आळते, कुशिरे तर्फ ठाणे, जोतिबा डोंगर परिसरात जे वन्यप्राणी तसेच पशू-पक्षी संकटात सापडले होते त्यांना आम्ही सुखरूपपणे संकटातून बाहेर काढून जंगलात सोडले आहे. यासाठी वनविभागाचे चांगले सहकार्य लाभले. वन्यजीवांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.
- सुरेश बेनाडे, निसर्गमित्र, पोहाळे तर्फ आळते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com