

आनंदी लॉ कॉलेजचे कायदेविषयक शिबिर
पुनाळ : कळंबे तर्फ कळे (ता. करवीर) येथील आनंदी लॉ कॉलेजचे कायदेविषयक मदत शिबिर झाले. आडूर (ता. करवीर) येथे झालेल्या शिबिरात कायदेविषयक मदत शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना कायद्याविषयी जागरूक करणे, त्यांचे हक्क व कर्तव्य समजावून सांगणे तसेच कायदेशीर समस्यांवर मार्गदर्शन करणे हा शिबिराचा मुख्य उद्देश होता. शिबिरात उपस्थित विधिज्ञ व प्राध्यापकांनी महिलांचे अधिकार, कौटुंबिक कायदे, ग्राहक संरक्षण, मोफत कायदे सहाय्य योजना, तसेच नवीन फौजदारी कायद्यांविषयी मार्गदर्शन केले. नागरिकांच्या वैयक्तिक समस्यांचे निराकरण करून त्यांना सल्ला देण्यात आला. शिबिरात ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनीही स्वयंसेवक म्हणून सक्रिय सहभाग नोंदवून शिबिर यशस्वी करण्यास मदत केली. शिबिराचे आयोजन डॉ. सतीश देसाई तसेच डॉ. विद्या देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लॉ कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. रवींद्र करपे, प्रा. नम्रता पोतदार, प्रा. निशिगंधा पाटील व प्रा. शैलेंद्र पंडित यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.