

‘पाणी सोडण्यापूर्वी
अस्तरीकरण करा’
सरवडे, ता. ६ : काळम्मावाडी प्रकल्पातील डाव्या कालव्याच्या कायमस्वरूपी अस्तरीकरणाचे काम पाणी सोडण्यापूर्वी केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टळू शकते. तेव्हा पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी यांनी केले आहे. काळम्मावाडी प्रकल्पाचा डावा कालवा पनोरी (ता. राधानगरी) येथे फुटल्यानंतर पाटबंधारे खात्यामार्फत तात्पुरती दुरुस्ती करून पाणी सोडले आहे, पण आता कालव्याच्या कायमस्वरूपी अस्तरीकरणाच्या दुरुस्तीचे काम लगेच सुरू करणार आहेत असे समजते. डाव्या कालव्याला कि.मी. १ ते १० मध्ये गेली ३० वर्षे काम केलेले नाही. काम होण्यास आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. मात्र, ते आता न करता पावसाळ्यानंतर पाणी सोडण्यापूर्वी करावे. हे काम सुरू झाल्यानंतर किमान दोन महिने कालव्यातून पाणी सोडले जाणार नाही. वेळेत पाणी न मिळाल्यास पिकांचे नुकसान होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.