BSNL Network Issue in Sangli : BSNL जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर? 538 पैकी अवघ्या 82 गावांत फायबर; 'कनेक्टिंग इंडिया'च्या नाऱ्याला मोठा धक्का!

Why BSNL Connectivity is Declining in Sangli : सांगली जिल्ह्यातील ४५६ गावांमध्ये बीएसएनएल सेवा जवळपास ठप्प झाली असून फायबर कनेक्टिव्हिटी रखडल्याने ग्रामीण भागातील इंटरनेट, ऑनलाइन शासकीय योजना, डिजिटल शिक्षण आणि नागरिकांच्या सेवांवर मोठा परिणाम होत आहे.
BSNL network problem in Sangli villages

BSNL network problem in Sangli villages

esakal

Updated on

सांगली : भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) सेवा जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या टप्प्यावर आली आहे. जिल्ह्यातील तब्बल ४५६ गावांमध्ये ‘बीएसएनएल’ची सेवा जवळपास ‘नॉट रिचेबल’ झाली (Sangli rural internet connectivity problem) आहे. ‘नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क’अंतर्गत ५३८ गावांपर्यंत ‘फायबर कनेक्टिव्हिटी’ पोहोचविण्याचे उद्दिष्ट असले, तरी आतापर्यंत केवळ ८२ गावांपर्यंतच ही सेवा पोहोचली आहे. उर्वरित गावांपर्यंत ती कधी पोहोचणार, याबाबतही अनिश्चितता आहे. सरकारने ‘बीएसएनएल’कडे सापत्नभावाने पाहून खासगी कंपन्यांना रान मोकळे करून दिल्याचा आरोप होत असून, ‘कनेक्टिंग इंडिया’चा नारा देणाऱ्या या सार्वजनिक कंपनीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com