Sangli District Livestock Census
esakal
सांगली : जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था वाढत असतानाही पशुधनाच्या संख्येत मोठी घट झाल्याचे २१ व्या पशुगणनेतून स्पष्ट झाले (21st livestock census Sangli Maharashtra) आहे. जिल्ह्यातील एकूण पशुधनाची संख्या १४ लाख दोन हजारांवरून ११ लाख ६८ हजारांवर आली आहे. पाच वर्षांच्या तुलनेत तब्बल दोन लाख ३४ हजार पशुधन घटले आहे. यात गाय-म्हैस वर्गातील पशुधनासह शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे.