सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ एच हा संपूर्ण चारपदरी

रस्त्याबाबत नवा प्रस्ताव दाखल; लवकरच मान्यता
 पेठ ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ एच हा संपूर्ण चारपदरी
पेठ ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ एच हा संपूर्ण चारपदरीsakal

सांगली/ इस्लामपूर : पेठ ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ एच हा संपूर्ण चारपदरी करण्याबाबतचा नवा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्रालयाकडे सादर केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो स्वीकारल्याचे श्री. गडकरी यांच्या मंत्रालयातील खात्रीशीर सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे हा रस्ता काही ठिकाणी दुपदरी, काही ठिकाणी चारपदरी न होता पेठ ते सांगली संपूर्ण चारपदरी होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

गेले अनेक वर्षे सांगली शहराला जोडणारा पेठ-सांगली हा महामार्ग निकृष्ट मार्ग म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावर अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत. बऱ्याच वेळा या मार्गाचे काम झाले, मात्र रस्ता काही टिकला नाही. दोन वर्षांपूर्वी हा रस्ता राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. वास्तविक, त्यानंतरची प्रक्रिया खोळंबली. या रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ७५० कोटी रुपयांचा आराखडा करून पाठविण्यात आला होता.

त्यात काही ठिकाणी रस्ता दुपदरी, तर काही ठिकाणी चारपदरी होता. तो प्रस्ताव आता बदलण्यात आला आहे. नितीन गडकरी यांनी सांगलीत एका कार्यक्रमात या रस्त्याचे काम येत्या चार महिन्यांत सुरू करू, त्याची निविदा काढली जाईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर त्या प्रक्रियेला गती आली होती.

रस्त्याबाबतचा आधीचा प्रस्ताव ७४२ कोटी रुपयांचा होता. आता त्यात काम वाढणार असल्याने तो सुमारे एक हजार कोटीहून अधिक होईल. हा रस्ता अधिक प्रशस्त व्हावा आणि लवकर व्हावा, अशी सातत्याने मागणी केली होती.

- सुधीर गाडगीळ, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com