hotel business
sakal
सोलापूर - गेल्या काही दिवसांपासून गॅस टंचाईमुळे अडचणीत सापडलेल्या हॉटेल, ढाबे आणि उपहारगृहांना अखेर दिलासा मिळाला आहे. नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणचे सहसचिव अशोक आत्राम यांनी २ एप्रिलला केलेल्या नव्या प्राधान्यक्रमानुसार मागणीच्या २० टक्क्यांप्रमाणे हॉटेल, ढाब्यासह १२ क्षेत्राला गॅस पुरवठा केला जाणार आहे. बंद पडण्याच्या मार्गावर आलेल्या व्यावसायिकांना संजीवनी मिळणार आहे.