

Rescue teams carry out an overnight operation to rescue a one-and-a-half-year-old girl who fell into a borewell in Jaloli, Pandharpur taluka.
esakal
करकंब, : जळोली (ता. पंढरपूर) येथे शेतातील बंद बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला.उष्मती राहुल गावित (वय १.५ वर्षे, रा. शिसा, ता. धडगाव, जि.नंदुरबार) असे मृत बालिकेचे नाव आहे. रविवार (ता.२२) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास करकंब येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट नंबर दोन लगत जळोली हद्दीतील कांतिलाल नरसाळे यांच्या शेतातील बंद बोअरवेलमध्ये ऊसतोड मजुराची ही बालिका पडली होती.