

Protesting family members outside police station demanding justice after a rape victim in Pandharpur died following acid consumption during treatment.
esakal
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली गावात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लैंगिक अत्याचार पीडित तरुणीने अॅसिड पिऊन जीवन संपवले आहे. गावातीलच एका व्यक्तीने तिच्यावर दीड महिन्यांपूर्वी अत्याचार केला होता. मात्र यानंतर तरुणीने ॲसिड प्राशन केले. उपचारादरम्यान तिने रविवारी सोलापूर येथे अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.