

Pavana Closed Pipeline Project | Pimpri Chinchwad Water Supply
esakal
पिंपरी : ‘‘पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आहे. टाटा धरणातून एक टीएमसी पाणी आणण्याची व्यवस्था झाली, तर शहराचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत आम्ही सकारात्मक आहोत. त्याबाबत स्थानिक नेत्यांनी पाठपुरावा करावा. तसेच भामा-आसखेडचेही पाणी शहरात लवकरच येणार आहे. मोशी कचरा डेपोचे काम पूर्णत्वास आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. मात्र, मी स्वतः डेपोची पाहणी करणार आहे,’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी (ता.२३) दिली.