बिजलीनगरच्या अक्षय मांडगेचे सीए परीक्षेत यश

बिजलीनगरच्या अक्षय मांडगेचे सीए परीक्षेत यश
Published on

चिंचवड, ता. ७ ः बिजलीनगर येथील अक्षय पंढरीनाथ मांडगे हा सी.एच्या अंतिम परीक्षेत नुकताच उत्तीर्ण झाला. सीए होण्याचे त्याचे स्वप्न होते. कठोर परिश्रमाच्या जोरावर त्याने हे यश अखेर मिळविले.
या प्रसंगी पक्षनेते नामदेव ढाके, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, अक्षयचे वडील पंढरीनाथ मांडगे उपस्थित होते. अक्षयचे वडील प्राध्यापक पंढरीनाथ सहादू मांडगे हे चिंचवड येथील आबासाहेब चिंचवडे ज्युनिअर कॉलेजमधून सेवानिवृत्त झाले आहेत. तर आई सौ. किरण पंढरीनाथ मांडगे यांचे बी. एस्सी.शिक्षण झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा हे त्यांचे मूळ गाव आहे. अक्षयने माटे शाळेत १० वीच्या परीक्षेत ९२ टक्के; तर बीएमसीसी कॉलेजमधून इयत्ता बारावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळवले. इंदिरा कॉलेजमधून बी.कॉमची परीक्षा देत ८९ टक्के गुण मिळवले होते. एम. कॉमच्या परीक्षेत बीएमसीसी कॉलेजमध्ये ९३ टक्के गुण मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com