

इंदोरी, ता. ६ ः येथील प्रगती विद्यालय व आनंदराव काशीद पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थी संघ आणि दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आणि शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच राजश्री राऊत, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दशरथ ढोरे आणि प्राचार्य महादेव ढाकणे उपस्थित होते. यावेळी प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी दिवसभर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका साकारत शाळेचे दैनंदिन कामकाज यशस्वीपणे सांभाळले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन, शिस्त, वेळेचे नियोजन आणि शिक्षकांच्या जबाबदाऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
यावेळी पर्यवेक्षक युवराज रोंगटे, दत्तात्रय घोजगे, संजय चव्हाण आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत ज्योती पिंजण यांनी केले. सूत्रसंचालन शिफा शेख व वैभवी क्षीरसागर यांनी केले. नियोजन शारदा वाघमारे व अरविंद नाईकरे यांनी केले. आभार सतीश मिंडे यांनी मानले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.