पिंपरीतील वीजपुरवठा
सहा तास खंडित

पिंपरीतील वीजपुरवठा सहा तास खंडित

Published on

पिंपरी, ता. ११ ः पिंपरीमधील वीजपुरवठा गुरुवारी तब्बल सहा तास विस्कळित झाल्याने नागरिक हैराण झाले. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी कोणतीही पूर्वकल्पना न देता सकाळी ११ वाजता वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे घरून काम करणारे कर्मचारी, गृहिणी यांची मोठी गैरसोय झाली. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सकाळपासूनच वातावरणात उष्णता वाढली होती. अशातच वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा काही काळ बंद ठेवण्यात आल्याचे महावितरणच्या भोसरी विभागाच्यावतीने सांगण्यात आले. सकाळी ११ वाजता खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा सायंकाळी चारला सुरु करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com