

मोशी येथे लाकडाच्या वखारीला आग
पिंपरी, ता. १० : मोशी येथील रिव्हर रेसिडेन्सी परिसरातील लाकडाच्या वखारीला आग लागली. आगीत लाकूड, भंगार साहित्य जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. याची माहिती मिळताच मोशी, भोसरी, तळवडे, चाकण आणि पिंपरी-चिंचवड येथील अग्निशमन दलाचे १२ बंब दाखल झाले. तब्बल आठ तास प्रयत्न केल्यानंतर आग नियंत्रणात आली, अशी माहिती मोशी अग्निशमन केंद्राचे विनायक नाळे यांनी दिली.
सीएनजी पाइपलाइनला
नेहरूनगर येथे आग
पिंपरी, ता. १० : चेंबर आणि रसत्याचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून सीएनजी वाहिनीला गळती लागली. यावेळी सीएनजीने पेट घेतला. ही घटना पिंपरी नेहरूनगर येथील झिरो बॉइज चौकात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. झिरो बॉइज चौकात सीएनजी पाइपलाइन जोडण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी जेसीबीचा धक्का लागून वायूगळती झाली. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे बंब येथे तातडीने दाखल झाले आणि जवानांनी आग तत्काळ आटोक्यात आणली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.