

पिंपरी, ता.२२ : कोकणस्थ कुंभार समाज यांच्या वतीने आयोजित स्नेहमेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झाला. यावेळी समाजबांधव, पदाधिकारी, महिला, विद्यार्थी आणि नागरिकांच्या उपस्थिती होती.
समाजाच्या विविध क्षेत्रांत योगदान देणारे शंकर साळवी यांना ‘संतश्रेष्ठ श्री गोरोबाकाका समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिसे व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. सभासद कलाकारांनी सादर केलेले ‘कोकणची लोककला बहुरंगी नमन’ कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. पारंपरिक ढोलकी, झांज आणि लोकसंगीताच्या तालावर सादर झालेल्या या लोककलेतून कोकणची समृद्ध लोकपरंपरा, सांस्कृतिक वारसा आणि लोकजीवन उपस्थितांसमोर जिवंत करण्यात आले. दरम्यान, समाजातील महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आशा साळवी होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.