सायबर सुरक्षा मार्गदर्शन
पिंपरी,ता. १७ ः पिंपळे सौदागर येथील द्वारकाधीश रेसिडेन्सीमध्ये ‘समाज माध्यमांचा वापर व सायबर फसवणूक’ या विषयावर जनजागृती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिव्यांश नांदेकर यांनी रहिवाशांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन केले. डिजिटल युगात ज्येष्ठ नागरिक, महिला व सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करून ‘डिजिटल अरेस्ट’ व आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. समाज माध्यमांचा सुरक्षित व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष भटुलाल बागुल, सचिव रविकिरण हिल्लाळ, संजीव अन्नेगिरी, श्रीनिवास कुलकर्णी, राजेश काळे, मिलिंद पाटील, हितेन चव्हाण, भूषण पांडे, रवी जयस्वाल, मेधा पाटील यांनी पुढाकार घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

