

पिंपरी, ता. ९ : ‘‘काँग्रेस पक्ष संघटनेच्या पुनर्बांधणीसाठी बूथ ते राष्ट्रीय स्तरापर्यंत ‘संघटन सृजन अभियान’ राबविण्यात येत आहे. याचा अहवाल पक्ष नेतृत्वाकडे सादर करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर निरीक्षक तथा हिमाचल प्रदेशातील आमदार विनोद सुल्तानपुरी यांनी गुरुवारी (ता.९) दिली.
कासारवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुल्तानपुरी बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेश सचिव दाहर मुजावर, आमदार जयंत आसगावकर, निरीक्षक आनंद सिंग, ‘एआयसीसी’ सचिव पृथ्वीराज साठे, निरीक्षक भानुदास माळी, सचिव मनोज कांबळे, नरेंद्र बनसोडे, बाबू नायर, कौस्तुभ नवले, सायली नढे, डॉ. मनीषा गरुड आदी उपस्थित होते.
सुल्तानपुरी म्हणाले, ‘‘पिंपरी चिंचवड जिल्हास्तरावर काँग्रेस संघटन पातळीवर कमकुवत आहे. याची आम्हाला जाणीव आहे. शहराध्यक्ष पदासाठी सुमारे ३५ लोकांनी इच्छा व्यक्त केली. ब्लॉक अध्यक्ष तसेच इतर पदांसाठीदेखील इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. सर्व पदांसाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटून वैयक्तिकरित्या संवाद साधला. ’’
साठे म्हणाले, ‘‘यंदा पक्ष संघटन बांधणी वर्ष साजरे करत आहे. महाराष्ट्रात संघटन सृजन अभियान जोमाने सुरू झाले आहे. यामुळे पक्ष तळागाळातून मजबूत बनवण्याचा संकल्प आहे.’’
माळी म्हणाले, ‘‘अभियानाचा पाहिला टप्पा म्हणजे जिल्हा व ब्लॉक स्तरावर अध्यक्षांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. विभागनिहाय पदांसाठी निरीक्षक शिफारस करतील. प्रत्येक ब्लॉकमध्ये जाऊन निरीक्षक कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत.’’ प्रास्ताविक मयूर जयस्वाल यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.