भूमकर चौकापर्यंतचा रस्ता उखडल्याने अपघाताचा धोका

भूमकर चौकापर्यंतचा रस्ता उखडल्याने अपघाताचा धोका
Published on

पिंपरी, ता. ३१ ः काळा खडक, वाकड येथील चौधरी पार्क, स्वामी विवेकानंद परिसर ते भूमकर चौकापर्यंत संपूर्ण मार्ग उखडून रस्त्यावर खडी विखुरलेली आहे. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होत आहेत. पदपथावरही राडारोड्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. एखादा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
महापालिका व महावितरण यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे काम रखडलेले दिसून येत आहे. अपूर्ण स्थितीमधील पदपथामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. विद्युत केबल उघड्यावर पडलेली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. वर्दळीच्या वेळी या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुचाकी, चारचाकी वाहने उभी केलेली असतात. त्याने रस्ता अरुंद होऊन अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने याची त्वरीत दखल घेऊन काम पूर्णत्वास न्यावे. पदपथ तातडीने तयार करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

स्वामी विवेकानंद परिसर ते भूमकर चौकापर्यंतच्या मार्गाची अत्यंत दूरवस्था झाली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हीच अवस्था आहे. आणखी किती वर्षे या रस्त्याचे काम पूर्ण करणार नाही, हे प्रशासनाने सांगावे.
- विवेक म्हसकर, रहिवासी, वाकड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com