

पिंपरी, ता. ३ : पिंपरी चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत पिरंगूट, जांबे, पिंपळे सौदागर, मोशी आणि देहूगाव असे नवीन पाच पोलिस ठाणे आणि परिमंडळ चारसाठी नवीन पोलिस उपायुक्त पद निर्मितीबाबतचा प्रस्ताव पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी राज्य शासनाकडे पाठविला आहे. यामुळे आगामी काळात आयुक्तालयातील पोलिस ठाण्यांची संख्या २५ वरून ३० होणार आहे.
बावधन, हिंजवडी, सांगवी, एमआयडीसी भोसरी, दिघी, चिखली आणि देहूरोड या पोलिस ठाण्यांचे विभाजन करून ही पोलिस ठाणी निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे.
याशिवाय यापूर्वी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या परिमंडळ चारसाठी पोलिस उपायुक्त आणि इतर पदे मंजूर नसल्याने त्यासाठीचाही स्वतंत्र प्रस्ताव सादर केला आहे.
नव्या परिमंडळासाठी उपायुक्त दर्जाचे अधिकारी आणि आवश्यक मनुष्यबळासह नवीन पदांची निर्मिती होणार आहे.
पोलिस ठाणे - प्रस्तावित पदे
पिरंगुट - १९०
जांबे - १८९
पिंपळे सौदागर - १८३
मोशी - १९४
देहूगाव - १९४
परिमंडळ ४ - ११
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.