

AMRUTA FADNAVIS NEW SONG
ESAKAL
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्या कधी निरनिराळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात तर कधी चॅरिटी शो करताना दिसतात. मिसेस मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहेच. मात्र याशिवाय त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केलीये. त्या उत्तम गायिका आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात त्या गाणं गात असताना देवेंद्र फडणवीस कौतुकाने त्यांच्याकडे पाहतायत.