ASHOK SARAF
esakal
ASHOK SARAF REVEALS HOW HE LOST A TOOTH WHILE EATING: 'कोण होणार करोडपती' हा लोकप्रिय कार्यक्रम सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात अनेक कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्ती हजेरी लावताना दिसतात. नुकत्याच एका भागात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सहभागी झाले होते. त्यांच्या आगामी 'आदि अनंत' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दोघांनी कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी कार्यक्रमाची सूत्रसंचालक माधुरी दीक्षितसोबत दोघांनीही मनमोकळ्या गप्पा मारल्या. या गप्पांदरम्यान संकर्षणने माधुरीसाठी खास कविता सादर केली, तर अशोक सराफ यांनी त्यांच्या आयुष्यातील एक भन्नाट आठवण सांगितली. हा किस्सा ऐकून माधुरीसह उपस्थितांनाही हसू आवरता आलं नाही.