

AMIT BHANUSHALI CHANGES LOOK
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडीच्या असतात. मालिकेचा टीआरपी कायम ठेवण्यासाठी कथानकात अनेक बदल केले जातात. त्यात मालिकेतील कलाकारही अनेक पद्धतीच्या भूमिका साकारताना दिसतात, कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक. मात्र कधीकधी कथानकाच्या गरजेनुसार कलाकारांना वेगवेगळ्या वेशभूषादेखील कराव्या लागतात. त्यांना स्वतःचा लूक बदलावा लागतो. असाच लूक बदललाय स्टार प्रवाहच्या टॉप मालिकेच्या हिरोने. त्याचा एक फोटो व्हायरल होतोय ज्यात त्याच्या डोक्यावर टक्कल आहे. हातात काठी आणि साधे कपडे घालून तो सगळ्यांसमोर आलाय. ज्यात त्याला ओळखणंदेखील कठीण झालंय. कोण आहे हा हिरो?