Parastoo Ahmadi : इराणमध्ये हिजाब न घालता गायले गाणे; प्रसिद्ध गायिकेला चाबकाचे ७४ फटके, प्रवासावरही बंदी

Iran Hijab Law : इराणमध्ये अनिवार्य हिजाब नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रसिद्ध गायिका परस्तू अहमदीला ७४ फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली असून, तिच्यावर या शिक्षेची अंमलबजावणीही करण्यात आली आहे.
Why Was Parastoo Ahmadi Flogged?

Why Was Parastoo Ahmadi Flogged?

esakal

Updated on: 

इराणमध्ये अनिवार्य हिजाबच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रसिद्ध गायिका परस्तू अहमदी आणि तिच्या टीममधील चार सदस्यांना कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. हिजाब न घालता ऑनलाइन संगीत मैफल आयोजित केल्याचा ठपका ठेवत गायिका परस्तू अहमदीला ७४ फटके मारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ही शिक्षा प्रत्यक्षात अंमलातही आणण्यात आली आहे. याशिवाय तिच्या कलात्मक आणि व्यावसायिक कामांवर तसेच परदेश प्रवासावर दोन वर्षांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. या घटनेमुळे इराणमधील महिलांचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...