

madhuri dixit on mother in law and father in law
esakal
अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'चं सूत्रसंचालन करताना दिसतेय. तिने कार्यक्रमात आपल्या स्पर्धकांशी बोलताना अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. माधुरीने १९९९ मध्ये डॉ. नेने यांच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतरही माधुरीने तिचं अभिनयाचं करिअर सुरू ठेवलं. मात्र या सगळ्यात तिला सासू- सासऱ्यांनी खूप मदत केली. माधुरीच्या सासूबाईंचं नाव अनु नेने आहे आणि वडिलांचं नाव माधव नेने आहे. आता कार्यक्रमात माधुरीने तिचे सासूसासरे काय करतात आणि त्यांनी तिला कशी मदत केली याबद्दल सांगितलं आहे.