

Entertainment News : झी स्टुडिओज निर्मित आणि विविध कोरगांवकर दिग्दर्शित या ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाने प्रदर्शित होताच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. रहस्य, विनोद आणि लोककथांचा अनोखा संगम असलेल्या या चित्रपटाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे. मात्र या सगळ्यात सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती गूढ ‘मंजुळा’ची आणि केशवच्या आयुष्यात घडणाऱ्या अनाकलनीय घटनांची. चित्रपटाच्या पोस्टरमधील साडीतील केशवचा आगळावेगळा लूक आणि त्यामागचं रहस्य प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण करत आहे.