kimaya narayan

नमस्कार मी किमया ढवण-सैतावडेकर मी सध्या ई-सकाळ वेबसाईटवर फ्रिलान्सर पत्रकार म्हणून कार्यरत आहे. मला मनोरंजन विषयासंबंधित बातम्या लिहिण्याची आवड आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात मला कामाचा ५ वर्षांचा अनुभव आहे. मी डहाणूकर कॉलेज, विलेपार्ले येथून पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. मी २ ० १ ६ साली एबीपी माझा मध्ये एंटरटेनमेंट विभागात इंटर्न म्हणून काम केलं. त्यानंतर २ ० १ ७ साली मी प्रतिलिपी या सुप्रसिद्ध प्लॅटफॉर्मवर मराठी विभाग प्रमुख म्हणून एक वर्ष कार्यरत होते. त्यानंतर मी राजश्री एंटरटेनमेंट या कंपनीत पाच वर्षं डेस्क रिपोर्टर म्हणून काम केलं. राजश्री मराठी आणि राजश्री मराठी शोबझ या दोन युट्युब चॅनेल्सच्या डेस्क न्यूज आणि पोस्ट प्रॉडक्शन संबधीची कामं मी या काळात केली. या शिवाय नाट्यरंजन हा मराठी नाट्यविश्वातील घडामोडींवर आधारित कार्यक्रमाची जबाबदारी मी पाहिली. अनेक दिग्गज कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा अनुभव मला या दरम्यान घेता आला. याशिवाय मी एक व्हॉइस ओव्हर आणि डबिंग आर्टिस्ट आहे. राजश्री मराठी आणि अनेक चॅनेल्समधील बातम्यांना मी व्हॉइस ओव्हर दिला आहे. मनोरंजनाबरोबरच साहित्य, लाईफस्टाईल आणि स्पिरिच्युअल बातम्यांमध्ये मला रस आहे. सिनेमा, वेबसिरीज आणि नाटकं बघायला मला आवडतं आणि विविध विषयांवरील पुस्तके वाचणे हा माझा छंद आहे.
Connect:
kimaya narayan
आणखी वाचा