पाचशे-हजारासाठी भीक... 'रात्रीस खेळ चाले'ची वच्छी काय म्हणाली? बघू तुला कसं काम मिळतंय अशी धमकी दिली गेली

Ratris Khel Chale Actress Vachhi Reveals Career Struggle | Threats Over Work And Financial Difficulties |: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले' मधून वच्छीच्या पात्राची अचानक एक्झिट झाली. आता अभिनेत्रीने त्यामागचं खरं कारण सांगितलंय.
vachhi from ratris khel chale

vachhi from ratris khel chale

esakal

Updated on: 

झी मराठीवरील घराघरात गाजलेली मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील प्रत्येक पात्र गाजलं. अण्णा नाईक, शेवंता यांच्या सोबतच पांडू, सुशल्या, अभिराम, माई अशा सगळ्यांनीच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यातलंच एक गाजलेलं पात्र म्हणजे वच्छी. मालिकेत ही भूमिका अभिनेत्री संजीवनी पाटील यांनी साकारली होती. मात्र तिसऱ्या सीझनला अचानक मालिकेत वच्छीच्या मृत्यूचा सीन आला आणि या भूमिकेची शोमधून एक्झिट झाली. आता संजीवनी यांनी आपण मानधन वाढवून मागितल्यामुळे पात्र मारलं गेलं असं म्हटलंय. शिवाय त्यांनी निर्मात्यांवर गंभीर आरोपही केलेत.

Loading content, please wait...