RITEISH DESHMUKH DANCE VIDEO
esakal
RITEISH DESHMUKH AND GENELIA DESHMUKH AIRPORT VIDEO: रितेश देशमुख आणि जेनिलिया यांचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांना दोघांची जोडी प्रचंड आवडते. अनेकांचे दोघे आवडते कपल आहेत. आपल्या वागण्या-बोलण्यातून ते नेहमीच चाहत्यांची मनं जिंकून घेताना पहायला मिळतात. दरम्यान अशातच रितेश देशमुखचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये रितेश एका छोट्या चाहत्यासाठी चक्क एअरपोर्टवर डान्स करताना पहायला मिळतोय. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.