

Bollywood Composer Sachin Dev Barman
esakal
- नितीन मुझुमदार
Entertainment News : हिंदी चित्रपट संगीताच्या जवळ जवळ शतकी इतिहासात त्यांच्याएवढे प्रयोग मला नाही वाटतं कोणी केले असतील आणि नुसतेच प्रयोग करून थांबले असे नाही तर प्रत्येक प्रयोगाला यशस्वी करताना त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेले.सुमारे तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांच्यापेक्षा अधिक चित्रपटांना संगीत देणारे संगीतकार झालेही असतील..पण त्यांच्याइतका लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांचा 'स्ट्राईक रेट ' कोणी नाही राखला ,याबाबतीत दर्दी संगीत रसिकांमध्ये माझ्या मते एकमत होईल.