

amruta khanvilkar birthday
esakal
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. यात तिच्या इंडस्ट्रीमधल्या खास मैत्रिणीचादेखील समावेश आहे. अमृताच्या मैत्रिणीने भलीमोठी पोस्ट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोण आहे ही मैत्रीण? ही अभिनेत्री आहे सोनाली खरे. सोनाली आणि अमृता अनेक वर्षांपासूनच्या मैत्रिणी आहेत. तिने आता अमृताच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे फोटोही शेअर केलेत.