Financial Planning
Esakal
How the rich preserve wealth for generations and what Indian middle class can adopt
पुणे – रमा सांगत होती... माझे बाबा कायम म्हणतात की, प्रत्येक घरात अशा काही पिढ्या असतात ज्या भरपूर कमावतात.. पण त्यांच्या पुढच्या पिढ्या ते सगळं कमावलेलं घालवून बसतात.. एखाद्याची मुलंच व्यसनं करणारी निघतात, कोणाची मुलं बिजनेसमध्ये सगळं घालवून बसतात... तर कोण इतके कष्ट करतं आणि भरपूर प्रॉपर्टी करून ठेवतं... आणि हे पैशाचं जाणं येणं सुरूच राहतं...
ते जरी असं म्हणत असले तरी मला मात्र कायम प्रश्न पडायचा की… अंबानी, टाटा यांच्या दोन पिढ्या तर माझ्या समोर घडल्यात त्यांच्या बाबतीत असं का नाही झालं.. भारतात अशा कितीतरी मोठ्या फॅमिलीज आहेत ज्यांचा पिढ्यानपिढ्यांचा व्यवसाय अतिशय व्यवस्थित सुरू आहे मग असं कसं होईल..?
अनेक मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गीय घरांमध्ये पैसा कमावला जातो पण तो म्हणावा तसा टिकत नाही. पण मग श्रीमंतांची संपत्ती पिढ्यानपिढ्या कशी काय टिकते, ते नेमकं असं काय करतात जे आपण करत नाही किंवा ती गोष्ट आपल्याला माहितीच नाही. फॅमिली ऑफिस ही संकल्पना काय आहे, पैशाने मोठी लोकं याचं गणित कंस बसवतात आणि सामान्यांना देखील हे असं गणित बसवणं आणि त्यातून पैसा टिकवणं आणि वाढवणं शक्य आहे का..?
सगळं सविस्तर समजून घेऊया सकाळ+ या विशेष लेखातून..!