Premium|Large and Mid Cap Mutual Funds : SIP गुंतवणुकीचा विक्रम; लार्ज-कॅप आणि मिड-कॅप शेअर्समध्ये अजूनही संधी?

Large and Mid Cap Mutual Funds : अधिक जोखीम घेण्याची तयारी असलेल्या आणि किमान तीन ते चार वर्षे गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लार्ज अँड मिड कॅप फंडाचा पर्याय विचारात घेता येऊ शकतो. मागील कामगिरी, एसआयपी गुंतवणुकीतील वाढ आणि बाजारातील मूल्यांकन लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
Large and Mid Cap Mutual Funds

Large and Mid Cap Mutual Funds

esakal

Updated on: 

वसंत कुलकर्णी - vasant@vasantkulkarni.com

ज्या गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची तयारी थोडी जास्त आहे आणि ज्यांना अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे आणि जे किमान तीन-चार वर्षे गुंतवणूक करण्यास तयार आहेत, अशा गुंतवणूकदारांसाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लार्ज अँड मिड कॅप फंडाचा (पूर्वीचा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल टॉप १०० फंड) एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. या फंडाच्या प्रक्रियेचे चांगल्याप्रकारे मूल्यमापन करण्यासाठी पुरेशी आकडेवारी उपलब्ध आहे. या फंडाने मागील २८ वर्षांत स्पर्धात्मक परतावा दिला आहे. त्यामुळे हा फंड ‘कोअर होल्डिंग’साठी एक योग्य फंड आहे.

ऑगस्ट महिन्यात म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’च्या आकडेवारीने विक्रम केला. तीन वर्षांत बहुतांश इक्विटी फंडांनी एकेरी आकड्यात परतावा देऊनही, ऑगस्ट महिन्यांत ३२,२९७ कोटी रुपयांची ‘एसआयपी’मार्फत विक्रमी गुंतवणूक झाली. मागील आर्थिक वर्षातील ३.५० लाख कोटी रुपयांच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत १.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. मागील पूर्ण वर्षाच्या तुलनेत एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांतच ४५ टक्के गुंतवणूक झाली आहे. सप्टेंबर २०२४ पासून बाजारात आलेल्या दीर्घकालीन घसरणीनंतर, यावर्षी एप्रिलच्या सुरुवातीपासून बाजार बऱ्यापैकी सावरल्याचे दिसून येत आहे. प्रमुख निर्देशांकांच्या नीचांकी पातळीवरून दिशाबदल करत निर्देशांकांनी एकूण घसरणीच्या ३३ टक्के झीज भरून काढली आहे. प्रमुख निर्देशांक अद्याप त्यांच्या आधीच्या उच्चांकी पातळीपासून दूर असले तरी लार्ज-कॅप आणि मिड-कॅप कंपन्यांत अजूनही वाजवी मूल्यांकनाचे काही पर्याय उपलब्ध आहेत.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!

आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com