

India Economic Growth Forecast
esakal
जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. कुठे युद्धामुळे ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे, तर कुठे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि महागाईमुळे अर्थव्यवस्थांवर दबाव निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत मात्र एक सकारात्मक चित्र समोर आले आहे. जागतिक पतमानांकन संस्था मूडीजने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताच्या विकास दराचा अंदाज ६.५ टक्क्यांवरून वाढवून ७ टक्के केला आहे. म्हणजेच, जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्था आपला वेग कायम ठेवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
या वाढत्या विकास दरामागे नेमकी कोणती कारणे आहेत? देशातील नागरिकांची वाढती खरेदी क्षमता, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील विस्तार, खासगी कंपन्यांकडून गुंतवणुकीचे वाढते संकेत आणि बँकांची सुधारलेली आर्थिक स्थिती यांचा यात किती वाटा आहे? शिवाय, परदेशी गुंतवणुकीत झालेली वाढ भारताच्या अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे बळ देत आहे? हे आपण या लेखातून जाणून घेणार आहे.
दुसरीकडे, हे चित्र पूर्णपणे चिंतामुक्त करणारे नाही. अपुरा मान्सून, एल निनोचा संभाव्य प्रभाव, वाढती अन्नधान्य महागाई आणि व्याजदरातील वाढ यामुळे आगामी काळात आर्थिक विकासासमोर अडथळे निर्माण होऊ शकतात. विशेष म्हणजे, इराण युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झालेला असतानाही भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग कसा टिकवून ठेवला, हेदेखील समजून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग, मूडीजने भारताच्या विकास दराचा अंदाज का वाढवला, अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमागे कोणते घटक काम करत आहेत आणि आगामी काळात कोणती आव्हाने भारतासमोर उभी राहू शकतात, हे सविस्तर जाणून घेऊया.