Premium|Chief Election Commissioner Impeachment : भाष्य: ठराव प्रतीकात्मक; कृती हवी सकारात्मक!

Election Commission Controversy : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडी महाभियोगाचा ठराव मांडणार आहे. बहुमताअभावी हा ठराव संमत होणार नसला तरी, घटनात्मक पदांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी विरोधकांनी हे प्रतीकात्मक पाऊल उचलण्याचे निश्चित केले आहे.
Chief Election Commissioner Impeachment

Chief Election Commissioner Impeachment

esakal

Updated on

डॉ. अविनाश कोल्हे - राज्यशास्त्राचे प्राध्यापक

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधी पक्ष महाभियोगाचा ठराव आणणार आहेत. सत्ताधारी आणि विरोधातील सदस्यसंख्या बघता हा ठराव बारगळला जाईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तरी विरोधकांनी ठराव आणण्याचे ठरवले. याचे कारण राजकीय जीवनात काही कृती प्रतीकात्मक असतात.

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधी पक्ष महाभियोगाचा ठराव आणणार आहेत. हा ठराव विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’तर्फे मांडण्यात येणार आहे. दोन-तीन आठवड्यांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या संसदेतील कार्यालयात झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत हा निर्णय झाला. प्रजासत्ताक भारतातील ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्तासारख्या घटनात्मक पदावरील व्यक्तीच्या विरोधात महाभियोग चालवण्याचा ठराव दाखल होणार आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या विरोधात महाभियोग चालवावा, अशा आशयाचे ठराव संसदेसमोर आलेले आहेत. तेव्हासुद्धा ठराव संमत होऊन महाभियोग चालवण्याची वेळ आली नव्हती. आता मात्र परिस्थिती जास्त गंभीर असल्याचे दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com