Premium|Doctor Patient Communication : औषधांसोबत डॉक्टरांचे दोन शब्दही रुग्णाला देतात आधार

Importance Of Empathy In Healthcare : रुग्णालयातील आधुनिक उपचारपद्धतींसोबत डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद कमी होत चालल्याची खंत अनेकांना आहे. औषधांसोबत आपुलकीचे शब्दही उपचारांचा महत्त्वाचा भाग असल्याचे वास्तव या अनुभवातून समोर येते.
Doctor Patient Communication

Doctor Patient Communication

esakal

Updated on

आजार कोणाला आवडतो? त्रासदायकच तो. मग, अशा त्रासदायक वातावरणात डॉक्टरांचं बोलणं आधार देणारं वाटतं. औषधांचा जसा परिणाम होतो; तसाच या बोलण्याचा होतो. रुग्ण खूप विश्वास ठेवून उपचारासाठी आलेले असतात. औषधाएवढाच परिणाम त्यांच्यावर आपुलकीने बोलण्याने होतो...

मागच्या आठवड्यात वडिलांचं ऑपरेशन झालं, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये बऱ्याच वेळा येणं-जाणं झालं. किरकोळ ते गंभीर आजारापर्यंतचे ना-ना प्रकारचे रुग्ण हॉस्पिटलमध्ये होते. गोंगाट जास्त नव्हता. सगळं कसं नीट, टापटीप. जो तो कर्मचारी आपलं कर्तव्य पार पाडण्यात व्यस्त. कोणी कोणाशी जास्त बोलत नव्हता. नवीन पिढी मोबाईलमध्ये व्यस्त. केवळ तीन सेकंदं रिकामी गेली तर लगेच, आपोआप हात खिशातील मोबाईल काढण्याच्या कामाला लागत. जुनी पिढी हॉस्पिटलच्या मिळेल त्या कोपऱ्यात बसून बोलत होती तेवढाच काय तो आवाज. त्या आवाजात मात्र तक्रार होती. डॉक्टरांबद्दल, हो... डॉक्टरांबद्दल!

मी ऐकलेला संवाद खाली देत आहे...

एक : बोलतच नाहीत डाक्टर... नुसतं तोंडातल्या तोंडात काहीतरी बोलायचं, कागदावर खरा खरा लिहायचं... अन् झालं.

दोन : अहो, सगळीकडं तसंच आहे. कोणत्या पण दवाखान्यात जा, डॉक्टर घडाघडा बोलत नाहीत. घडाघडा राहिलं; पण आजाराबद्दल थोडं सांगावं की नाही? पण नाही...

एक : आणि आपण जरा विचारावं म्हणलं की, ‘होईल नीट, दिल्यात गोळ्या’ एवढचं...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com