Premium|Diego Garcia military base : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर दिएगो गार्सिया पुन्हा चर्चेत; हिंदी महासागरातील अमेरिकी तळाचे वाढते सामरिक महत्त्व

Indian Ocean geopolitics : हिंदी महासागरातील अमेरिकेचा सर्वात शक्तिशाली लष्करी तळ 'दिएगो गार्सिया' सध्या जागतिक संघर्षाचे केंद्र बनले असून, इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे या बेटाचे सामरिक आणि भू-राजकीय महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Diego Garcia military base

Diego Garcia military base

esakal

Updated on

डॉ. श्रीकांत कार्लेकर

आज दिएगो गार्सिया हा हिंदी महासागरातील एकमेव प्रमुख अमेरिकी लष्करी तळ आहे. यामुळे आशिया, आफ्रिका आणि मध्य पूर्वेमध्ये अमेरिकेला आपली शक्ती प्रदर्शित करता येते. लांब पल्ल्याच्या बॉम्बर्सच्या उड्डाणासाठी हा तळ आदर्श आहे. पश्चिमेला मध्य पूर्वेकडे आणि पूर्वेला पॅसिफिक महासागराकडे तोंड करून असलेला हा तळ हिंदी महासागरात मध्यवर्ती ठिकाणी आहे. हे बेट चक्रीवादळांच्या मार्गापासूनही दूर आहे.

ता.२१ मार्च २०२६ रोजी इराणने हिंदी महासागरात ३,८०० किलोमीटर अंतरावर असलेल्या दिएगो गार्सिया बेटावर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरून गेले. या घटनेने इराणची वाढती क्षेपणास्त्र क्षमता अधोरेखित केली. ही क्षेपणास्त्रे तिथल्या लष्करी तळावर आदळली नाहीत, मात्र या घटनेने इस्राईल, अमेरिका आणि इराण युद्धात दिएगो गार्सियाला असलेले महत्त्व प्रकर्षाने पुढे आले. म्हणूनच या बेटाविषयी जाणून घ्यायला हवे.

दिएगो गार्सिया (७.३० अंश दक्षिण अक्षांश/७२.४४ अंश अतिशय पूर्व रेखांश) हे हिंदी महासागरातील बेट या युद्धात आता एक महत्त्वपूर्ण ठिकाण होण्याची सर्वच देशांना खात्री वाटते. दिएगो गार्सिया ३२.५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले एक लहान प्रवाळ बेट (Coral Atoll) आहे. परंतु, जागतिक सुरक्षा आणि भू-राजकारणामध्ये त्याची भूमिका अत्यंत मोठी आहे. हे बेट अमेरिकेच्या सर्वात महत्त्वाच्या सामरिक लष्करी तळांपैकी एक आहे. बेटाच्या भौगोलिक स्थानामुळे हिंदी महासागर, पश्चिम आशिया आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सर्व भागांतून येथे वेगाने लष्करी हालचाली करणे शक्य होते. आपल्या भौगोलिक स्थानामुळे या बेटाला अतुलनीय सर्व्हेलियन्स (पाळत ठेवणे) क्षमता, नौदल वर्चस्व आणि रसद पुरवठ्याची जबरदस्त ताकद मिळाली आहे. जागतिक महासत्तांमध्ये जसजसा संघर्ष वाढत जातो, तसतसे दिएगो गार्सियाचे महत्त्व नेहमीच वाढत जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com