Premium|Heartstopper Love Story : नात्यांचा शोध घेणारी प्रेमकथा

Heartstopper Love Story and LGBTQ+ Representation : अ‍ॅलिस ओसेमन यांची ‘हार्टस्टॉपर’ ही ग्राफिक कादंबरी चार्ली आणि निक यांच्या नात्यातून पहिल्या प्रेमाची, भावनिक स्वीकाराची आणि मैत्रीची सुंदर कहाणी सांगते. पूर्वग्रह बाजूला ठेवून एखाद्या व्यक्तीला समजून घेणे आणि तिचे व्यक्तिमत्त्व स्वीकारणे यांचे महत्त्व ही कथा अधोरेखित करते.
Heartstopper Love Story and LGBTQ+ Representation

Heartstopper Love Story and LGBTQ+ Representation

esakal

Updated on: 

अनुश्री प्रधान

हार्टस्टॉपर ही फक्त एक प्रेमकथा नाही, तर त्यापेक्षा खूप अधिक आहे. कोणासाठी तरी आपण उपलब्ध असणे, त्याचाविषयी पूर्वग्रह न बाळगता त्याला समजून घेणे, ती व्यक्ती जशी आहे तशीच राहू देणे जीवनात महत्वाचे असते. या निष्ठूर जगात समोरच्या माणसाला सहानुभूतीपूर्वक स्वीकारावे, हे या कथेत प्रभावीपणे पण तितक्याच हळूवारपणे मांडले आहे.

काही प्रेमकथा वाचून संपल्यानंतरही आपल्या मनात एक हळूवार आठवण ठेवून जातात. अशीच एक प्रेमकथा म्हणजे हार्टस्टॉपर पुस्तक मालिका. पहिल्या प्रेमाची प्रेमभावना आणि बरेच काही आपल्याला हार्टस्टॉपर कथेतून अनुभवायला मिळते. हार्टस्टॉपर ही अ‍ॅलिस ओसेमन यांनी लिहिलेली आणि चित्रित केलेली ब्रिटिश वेबकॉमिक व ग्राफिक कादंबरी आहे. ही कथा चार्ली स्प्रिंग आणि निक नेल्सन या दोन शाळकरी सहाध्यायींभोवती फिरते. चार्ली समलिंगी आहे. तो दयाळू, संवेदनशील आहे. समोरच्याची मनापासून काळजी तो घेतो. संवेदनशील असला तरी तितकाच धीराचाही आहे. किशोरवयात तो अनेकदा असुरक्षितता आणि चिंता यांच्याशी झुंज देतोय. त्याच्या या अवस्थेमुळे आणि त्याच्या गुणांमुळे वाचकांना चार्लीबद्दल आपुलकी वाटू लागते. यातील दुसरी व्यक्तिरेखा आहे निक नेल्सन या लोकप्रिय रग्बी खेळाडूची. चार्लीप्रमाणेच निकही दुसऱ्याच्या भावना समजून घेणारा परिपक्व विचारांचा मुलगा आहे. चार्लीचे मित्र तर त्याला ‘गोल्डन रिट्रीव्हर’ म्हणतात.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!

आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com