Premium|Stock Market Investment : शेअर बाजारातील गुंतवणूक हे शास्त्र की कला? सातत्याने परतावा मिळवण्यासाठी अभ्यास आवश्यक

Stock Market Investment Strategy : शेअर बाजारातील गुंतवणुकीत सातत्याने परतावा मिळवण्यासाठी कंपनीचा अभ्यास, आर्थिक मूल्यमापन, जोखीम व्यवस्थापन आणि गुंतवणुकीचे शास्त्र व कलेचा समन्वय आवश्यक.
Stock Market Investment Strategy

Stock Market Investment Strategy

esakal

Updated on: 

अरविंद परांजपे - asparanj@gmail.com

शेअर बाजारात गुंतवणूक करून सातत्याने चांगला परतावा मिळवणे ही केवळ आकडेमोड किंवा कंपनीची आर्थिक पत्रके तपासण्याची बाब नाही. त्यासाठी बाजाराचा सखोल अभ्यास, कंपन्यांच्या व्यवसायाचे मूल्यमापन, जोखमीचे भान आणि बदलत्या परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता आवश्यक असते. गुंतवणुकीच्या या प्रवासात शास्त्राची शिस्त आणि कलेची कल्पकता या दोन्हींचा कस लागतो. मग गुंतवणूक हे शास्त्र आहे की कला? यशस्वी गुंतवणुकीसाठी या दोन्हींचा समन्वय कसा साधायचा? यावर टाकलेला हा प्रकाशझोत...

दोन मित्र खूप दिवसांनी भेटतात. गप्पा मारताना एक जण दुसऱ्याला विचारतो, ‘‘तू खूप वर्षे शेअर बाजारात ट्रेडिंग करतो आहेस, तर तू बुल आहेस की बेअर?’’ दुसरा मित्र उत्तर देतो, ‘‘अरे, दोन्ही नाही. माझा प्रचंड तोटाच झाला आहे आणि मी तर गाढव ठरलो!’’ यातील विनोदाचा भाग सोडला, तरी असे दिसून येते, की शेअर बाजारात वैयक्तिक पातळीवर ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करणाऱ्यांपैकी फारच थोडे जण फायदा कमावतात. ‘सेबी’च्या अहवालानुसार, ८६ टक्क्यांपेक्षा अधिक डेरिव्हेटिव्ह ट्रेडरना (फ्युचर्स अँड ऑप्शन्स) तोटा झालेला आहे. अर्थसल्लागार म्हणून काम करताना वारंवार असा अनुभव येतो, की गुंतवणूक म्हणून कित्येक कोटी रुपयांचे शेअर अनेक वर्षे बाळगणाऱ्यांनाही त्यांच्या शेअरवर वार्षिक परतावा (सीएजीआर) किती मिळाला किंवा मिळत आहे, याची माहिती नसते. (मी केलेल्या १५० शेअर गुंतवणूकदारांच्या पाहणीतही याला दुजोरा मिळाला.) ‘‘आमच्याकडे सर्व ब्लूचिप शेअर आहेत,’’ अशी फुशारकी मारणाऱ्यांना या शेअरवर गेल्या पाच वर्षांत मुदत ठेवींपेक्षाही (एफडी) कमी किंवा उणे परतावा मिळाला आहे, याची माहिती नसते. कमी परताव्यासाठी आपण किती जोखीम घेतली आहे, याचीही त्यांना जाणीव नसते. अनेकांना ‘डिव्हिडंड यील्ड’ म्हणजे काय, हेही माहीत नसते. त्यामुळे शेअरच्या दर्शनी मूल्यावर मिळालेल्या लाभांशाची टक्केवारी पाहून ते स्वतःची पाठ थोपटून घेतात. म्हणजे, दोन टक्क्यांपेक्षा कमी ‘डिव्हिडंड यील्ड’ मिळत असताना आपल्याला १५ टक्के लाभांश मिळतो आहे, असा गैरसमज ते करून घेतात. याचे मुख्य कारण म्हणजे गुंतवणूक करणे हे एक गहन शास्त्र आहे, याची बहुसंख्य लोकांना जाणीवच नसते. त्यांच्या दृष्टीने शेअरची निवड करताना मित्रांकडून, ब्रोकरकडून किंवा दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांवरून मिळालेल्या टिप्स, गेल्या ५२ आठवड्यांतील शेअरच्या भावातील उच्चांक आणि नीचांक (हाय-लो) आणि कंपनीविषयीची जुजबी माहिती एवढाच आधार असतो. प्रत्यक्षात, शेअरमधील गुंतवणूक हा फावल्या वेळात करायचा उद्योग नाही. अर्थक्षेत्रातील सखोल ज्ञान, पूर्ण वेळ अभ्यास आणि प्रदीर्घ अनुभव यांच्या आधारेच लाभदायी गुंतवणूक करता येते.

Loading content, please wait...