Premium|Tibet China Conflict : चीनच्या ताब्यातील तिबेटचा संघर्ष; भाषा, संस्कृती आणि मातृभूमी वाचवण्याची लढाई

Tibet’s Cultural Identity and Struggle : चीनच्या ताब्यात गेल्यानंतर तिबेटची भाषा, संस्कृती आणि धर्म टिकवण्यासाठी सुरू असलेला संघर्ष ‘फयुल’ या नाटकातून रंगमंचावर मांडला आहे. मातृभूमी आणि अस्तित्वाचा हा लढा काय सांगतो?
Tibet China Conflict

Tibet China Conflict

esakal

Updated on: 

प्रा. डॉ. अविनाश कोल्हे - sakal.avtaran@gmail.com

जगाच्या इतिहासात काही देश भौगोलिक पातळीवर दुर्दैवी समजले जातात. त्यासंदर्भात चटकन समोर येणारं नाव म्हणजे युरोपातील पोलंड देश. हा देश जर्मनी आणि रशिया यांच्यात भरडला गेलेला आहे. तसंच आज ज्याचा घास घेण्यास व्लादिमीर पुतीन यांचा रशिया आतुर झालेला आहे तो युक्रेन. या देशांना त्यांच्या भौगोलिक स्थानामुळे तसेच शेजारच्या देशाच्या तुलनेत आकाराने लहान असल्यामुळे सतत परकीय आक्रमणांचा सामना करावा लागला. युक्रेनवर तर २०२२ सालापासून रशियाचं आक्रमण सुरू आहे. आशियातील असाच एक देश म्हणजे तिबेट.

माओ त्से-तुंग यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये १ ऑक्टोबर १९४९ रोजी कम्युनिस्ट सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी देशाच्या सीमा सुरक्षित करायला सुरुवात केली. त्याचा एक बळी म्हणजे चिमुकला तिबेट (आज लोकसंख्या सुमारे ३६ लाख). ऑक्टोबर १९५० मध्ये माओ यांच्या फौजा तिबेटमध्ये शिरल्या. तेव्हापासून हा देश चीनच्या ताब्यात आहे.

चीनने १९५० पासून तिबेटवर सर्व प्रकारे नियंत्रण प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे तिबेटची भाषा, संस्कृती, धर्म धोक्यात येत असल्याचं जाणवल्यामुळे संख्येने आणि लष्करी शक्तीने फार लहान असलेल्या तिबेटी समाजाने जमेल तसा संघर्ष सुरू केला. हे तपशील डोळ्यांसमोर ठेवत अभिषेक मजुमदार लिखित आणि तिबेटियन ल्हाक्पा त्सेरिंग-जर्मन हॅरी फुरमन दिग्दर्शित तिबेटी भाषेतील नाटक ‘फयुल’ला सामोरं जावं लागतं. तिबेटी भाषेत फयुल म्हणजे मातृभूमी. गेली तीन वर्षं या नाटकाचं काम सुरू होतं. त्यातील सर्व कलाकार तिबेटी आहेत. अलीकडेच मुंबईत पार पडलेल्या पृथ्वी थिएटरच्या नाट्यमहोत्सवात हे नाटक बघायला मिळालं.

Loading content, please wait...