

AI in Agriculture Weather Forecast for Farmers
esakal
El Nino Impact on Farmers : (मयुरेश प्रभुणे) : यंदाच्या मॉन्सून हंगामात ‘एल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात अपुऱ्या आणि अनियमित पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठी राज्याच्या कृषी विभागातर्फे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (एआय) मार्गदर्शक प्रणाली (आय-सॅट) अवलंबण्यात येत आहे.