

120 tons sugarcane per acre in Govind Bagh even in low rain!
Sakal
बारामती : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर शेतीमध्ये केल्यास उत्पादनवाढीसह खर्चातही मोठी बचत होऊ शकते, हे बारामतीतील गोविंद बाग येथे झालेल्या ऊस उत्पादनाच्या प्रयोगातून समोर आले आहे. कमी पावसाच्या परिस्थितीतही एआय आधारित ऊस व्यवस्थापनामुळे एकरी सरासरी १२० टन उत्पादन मिळाले आहे. विशेष म्हणजे, मागील १५ वर्षांच्या तुलनेत एकरी उत्पादनात तब्बल ६० टनांची वाढ झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचे उत्पादन दुप्पट झाले आहे. राज्यातील अनेक शेतक-यांनीही इतक्याच मोठया प्रमाणावर एआयच्या मदतीने उसाचे उत्पादन घेतले आहे.