

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.६ ः युवकांशी संवाद वाढवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवत भाजप युवा मोर्चाने २० मार्गांवर मोटारसायकल फेरीचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी १७ सप्टेंबर रोजी गुजरातमधील त्यांचे जन्मस्थान वडनगर येथून फेरीला प्रारंभ होईल.
अलीकडील काळात युवकांनी दिल्लीसह अन्य ठिकाणी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जेन झी अर्थात युवकांशी संपर्क वाढविण्याचा भाजपचा निर्धार आहे. भाजप सरकारच्या मागील १२ वर्षातील कामगिरीची माहिती या फेरीच्या माध्यमातून दिली जाणार आहे. ‘जन्मस्थळ ते कर्मभूमी’ असे शीर्षक या मोटारसायकल फेरीला दिले आहे. मोदी यांचे गुजरातमधील जन्मस्थान वडनगर ते त्यांची कर्मभूमी उत्तर प्रदेशातील वाराणसीपर्यंत ही फेरी निघेल. पंतप्रधानांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याला २५ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत सात ऑक्टोबरला फेरीची सांगता होईल.
भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि बडोद्याचे खासदार हेमांग जोशी यांनी मोटारसायकल फेरीसाठी पुढाकार घेतला आहे. एकूण २० मार्गांवरून ही फेरी जाईल. प्रत्येक मार्गावरील फेरीत युवा मोर्चाचे ५० कार्यकर्ते सहभागी होतील. एकूण एक हजार युवक या भाग घेणार आहेत. पहिली फेरी वडनगर ते वाराणसी अशी असेल तर दुसरी फेरी वाराणसी ते वडनगर अशी असेल. गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्ली या राज्यातून ही फेरी जाईल. रॅलीदरम्यान कार्यकर्ते सामान्य जनतेशी संवाद साधतील. केंद्र सरकारच्या कामाची आणि त्यातही युवकांसाठी सरकारने राबविलेल्या योजनांची माहितीही देण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.