.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Pune District Court
पुणे - पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा ई-मेल सोमवारी (ता. २३) दुपारी मिळाल्याने न्यायालय परिसरात खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी न्यायालयातील वकील, पक्षकार आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना बाहेर काढून परिसर रिकामा केला. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने न्यायालयाची तपासणी केली. मात्र, संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने सायंकाळी साडेचारच्या सुमारास न्यायालयीन कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले.