लीड

लीड
Published on

लीड

बाजारात असंख्य उत्पादनं उपलब्ध असताना ग्राहक एखाद्याच ब्रँडकडे वारंवार का वळतो? एखाद्या नावावर इतका विश्‍वास का ठेवतो? या प्रश्नांची उत्तरं ‘ब्रँडिंग’मध्ये दडलेली आहेत. ब्रँडिंग म्हणजे फक्त उत्पादन विकण्याची युक्ती नाही, तर ग्राहकांच्या मनात निर्माण होणारी ओळख, भावना आणि विश्‍वासाचा प्रवास आहे. एखादं नाव, त्याची स्टाइल, गुणवत्ता, लोकांशी जोडलेलं नातं आणि वर्षानुवर्षं टिकून राहिलेला विश्‍वास या सगळ्यांतून ब्रँड तयार होतो. काही ब्रँड आपल्या आयुष्याचा इतका भाग होतात, की नकळत आपण त्यांच्याशी जोडले जातो. बदलत्या काळानुसार ब्रँडिंगचं स्वरूपही बदलत असून, सोशल मीडिया आणि डिजिटल जगामुळे प्रत्येकाला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची नवी संधी मिळत आहे. काळानुसार बदलणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षा, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, डिजिटल मार्केटिंगची नवी दालनं आणि स्वतःची वेगळी छाप निर्माण करण्याची स्पर्धा या सगळ्यामुळे ब्रँडिंग आज प्रत्येक क्षेत्राचा अविभाज्य भाग ठरत आहे. याच ब्रॅंडिंग विश्‍वात एक फेरफटका मारू या...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com